इतिहास,
अशी झाली स्थापना......
सन १९७७-७८ मध्ये केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या कर्मचार्यांना व माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतरांना वेतन भत्ते मिळावेत यासाठी राज्यव्यापी ५४ दिवसांचा बेमुदत संप झाला होता.संपाचे दिवस जसजसे वाढू लागले तसतशी आर्थिक चणचण सर्वांना जाणवू लागली.
कर्मचार्यांच्या,शिक्षकांच्या सोसायट्या पतपेढ्यांनी सभासदांना आर्थिक आधार दिला. मात्र शिक्षकेतर कर्मचार्यांना असा कोणताही आधार नव्हता.त्या वेळी पुणे शहरात माध्यमिक शिक्षक पतपेढी कार्यरत होती.शिक्षकेतर कर्मचारी वर्गापैकी लिपिक, ग्रंथपाल अशा सेवकांना त्या पतपेढीत सभासदत्व मिळत असे , फक्त शिपाई मात्र सभासद होऊ शकत नसत. म्हणून शिक्षकेतर संघटनेचे कार्यवाह कै.अनिल काळे, कै.आप्पासाहेब पाटणकर,स.ग.सकपाळ, कै.श.रं.डंबीर यांनी प्रयत्न पूर्वक सहकारी बँकेकडून स्वतः कर्ज उभारून शिपाई सेवकांना २०० रूपयांची मदत केली.
येथे " गरज ही निर्मितीची जननी असते " हे सर्वांच्या लक्षात आले. शिक्षकेतर कर्मचार्यांची विशेषतः शिपाई मंडळींसाठी वाजवी दरात कर्ज उपलब्ध करून देणार्या सहकारी संस्थेची, पतपेढीची निकड सर्वांना प्रकर्षाने जाणवली.
त्या नंतर कार्यकर्त्यांच्या विचारविनिमय,चर्चा झाल्या.अशा स्थितीत पतपॆढी काढणे जसे गरजेचे होते तसेच मोठे आव्हानही होते.सर्वांनी हे आव्हान स्वीकारले.
३० जून १९७८ रोजी पतपेढीची कायदेशीर स्थापना व नोंदणी झाली. अध्यक्ष म्हणून श्री.रा.ब.पाटणकर,उपाध्यक्ष म्हणून श्री.माधवराव गोगावले व संचालक म्हणून श्री.का.रा.वैशंपायन,श्री.स.ग.सकपाळ इत्यादी मान्यवरांनी नेतृत्व दिले व सभासदांसाठी कर्मचार्यांचे प्रबोधन सुरू झाले आणि पुणे शाहरातील ४८ शाळांमधील २२४ कर्मचारी सभासद झाले. आरंभी कर्जाची रक्कम रू.२०००/- इतकी होती तर तातडीचे कर्ज रू.२०० मिळत असे. आजरोजी ही कर्जाची रक्कम रू. ९,००,०००/-इतकी तर तातडीचे कर्ज रु.२०,०००/-मिळते. तसेच आजरोजी शाळा सभासद १३६ पर्यंत व सभासद ५६९ पर्यंत वाढ झाली म्हणून म्हणता येईल " पाऊले चालती प्रगतीची वाट " व, " इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी " आशा प्रकारे शिक्षकेतरपतपॆढी चा जन्म झाला व वाढ होत आहे.तसेच निस्पृह वृत्तीचे खंदे कार्यकर्ते या पतपेढीच्या वाढीसाठी मिळत गेले जसे विनायक सखाराम कुलकर्णी,अरविंद शिंदे इ. मान्यवर.
केवळ आर्थिक व्यवाहारापूर्तीच पतपेढचे कार्य मर्यादित नसून शिक्षकेतरांच्या सामाजिक व शैक्षणिक विकासाबरोबरच शिक्षणक्षेत्रातील सर्वांचेच मार्गदर्शन केंद्र म्हणून शिक्षकेतर पतपेढीचा नावलौकीक आहे. भविष्यात देखील शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना,आपल्या पाल्यांच्या गुणत्तावाढीच्या दृष्टीने स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र इत्यदी उपक्रम राबवण्याचा आम्हा सर्व संचालकांचा मानस आहे.
पतपेढीच्या यशस्वी वाटचालीत सर्व सभासद बंधू भगिनी ,हितचिंतक,ठेवीदार इत्यदी यांचा मोलाचा वाटा आहे.