सन्माननीय सभासद बंधु-भगिनींनो,
सस्नेनह नमस्कार,
" सहकार हेच जीवन " या पतसंस्थेच्या बोधवाक्यानुसार प्रेरित झालेल्या तुम्हा आम्हा सर्व शिक्षकेतर सभासदांची प्रेमाची व विश्वासाची प्रतिक असलेली आपली पतपेढी ४३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. शिक्षकेतरांच्या येणार्या आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी १९७८ साली शिक्षकेतरांच्या स्वतंत्र पतपेढीचे छोटेसे रोपटे लावले गेले व आपणा सर्वांच्या सहकार्याने या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याचे आज आपण पाहत आहोत. ५६९ सभासद असलेल्या आपल्या पतसंस्थेस सातत्याने लेखापरीक्षणात 'अ' दर्जा मिळालेला आहे, हे सांगताना आम्हा सर्व संचालकांना अभिमान वाटतो आहे.
केवळ आर्थिक व्यवाहारापूर्तीच पतपेढचे कार्य मर्यादित नसून शिक्षकेतरांच्या सामाजिक व शैक्षणिक विकासाबरोबरच शिक्षणक्षेत्रातील सर्वांचेच मार्गदर्शन केंद्र म्हणून शिक्षकेतर पतपेढीचा नावलौकीक आहे. भविष्यात देखील शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना,आपल्या पाल्यांच्या गुणत्तावाढीच्या दृष्टीने स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र इत्यदी उपक्रम राबवण्याचा आम्हा सर्व संचालकांचा मानस आहे.
पतपेढीच्या यशस्वी वाटचालीत सर्व सभासद बंधू भगिनी ,हितचिंतक,ठेवीदार इत्यदी यांचा मोलाचा वाटा आहे.