कै.रामचंद्र बहिर्जी पाटणकर पुरस्कार.
"कै.शशिकांत रंगनाथ डंबीर क्रियाशील कार्यकरता पुरस्कार"
सन २०१९ पासून कै.श.रं.डंबीर क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार ह्या ऐवजी कै.रा.ब.पाटणकर क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार या नावाने सुरू करण्यात आला. पतपेढीचे संस्थापक व माजी अध्यक्ष रा.ब.पाटणकर यांचे मागच्या वर्षी नुकतेच दु:खद निधन झाले त्यामुळे त्यांची व त्यांच्या कार्याची आठवण रहावी म्हणून त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला आहे. शाळांमध्ये आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक यांना प्रतिवर्षी पुरस्कार देऊन गौरविले जाते पण शाळेचा अविभाज्य घटक असलेले शिक्षकेतर कर्मचारी ह्यांच्या कामाची दखल घेऊन पुरस्कार देण्याची कल्पना कोणालाही सूचली नाही. म्हणूनच अशा कर्मचार्यांची चांगल्या कामची दखल घेतली जाईल अशी वाट पाहण्यापेक्षा पतपेढीने हा क्रियाशील कार्यकर्ता पुरस्कार सन १९९६-९७ पासून सुरू केला व आजतागातत तो पुरस्कार देणे चालू आहे.
कै.रामचंद्र बहिर्जी पाटणकर पुरस्कार.२०१९-२०
• सौ.येवलेकर कौमुदी मनोज ( सेंट हिल्डाज हायस्कूल)
• श्री.गायकवाड रविंद्र रघुनाथ ( नु.म.वि.मुलींची प्रशाला व ज्युनि.कॉलेज)
• श्री.शेलुकर सुनिल महादेव ( मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर)
• श्रीमती.निकाळजे रत्नमाला जगदिश ( एस.व्ही.युनियन हायस्कूल)
• श्री.चव्हाण लक्ष्मण विठॊबा ( कै.ज.ना.दुगड विद्यालय)
कै. शशिकांत रंगनाथ डंबीर पुरस्कार मागील सर्व पुरस्कार यादी
मागील आधिक पुरस्कारासाठी येथे क्लिक करा.
कै.का.रा.वैशंपायन पुरस्कार.
फक्त पुणे जिल्हयातील नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणार्या सर्वांनाच परिचीत असलेले कै.श्री.का.रा.वैशंपायन यांच्या निधना नंतर, त्यांचे सर्वत्र शिक्षेकतर बंधु भगिनींना कायम स्मरण रहावे याच एकमेव उद्देशाने व त्यांचे कार्य सतत आम्हा सर्वांना प्रेरणा देत रहावे, याच हेतुने त्यंच्या नावाने जिल्हा स्तरावर क्रियाशील कार्यकर्त्यास पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या पुरस्काराचे वैशिष्ट्य असे की जो शिक्षकेतर कर्मचारी आपल्या शाळेच्या कामा व्यतीरीक्त पुणे जिल्हा स्तरावरील शाळां मधील शिक्षकेतर कामांसाठी निस्पृह व विना मोबदला मदत करतॊ अशा कार्यकर्त्यास हा पुरस्कार देण्यासाठी दरवर्षि निवड केली जाते कारण कै.का.रा.वैशंपायन असेच एक व्यक्तिमत्व होते.हा पुरस्कार वर्ष २००६-२००७ मधे चालू झाला.
कै.का.रा.वैशंपायन पुरस्कार वर्ष २०१९-२०२०
• श्री.गोरे विनोअद रामभाऊ (माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वारजे)
मागील आधिक पुरस्कारासाठी येथे क्लिक करा.
शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार.
केवळ शिक्षकेतर कर्मचार्यांसाठीच पतपेढीचे अथवा संघटनेचे कार्य मर्यादित नसुन शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करणार्या अधिकारी वर्गासाठी देखील पतपेढीच्या व संघटनेच्या वतीने पुरस्कार देण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठी व उन्नतीसाठी झटून कार्य करणार्या अधिकार्यासाठी पतपेढीसंघटना , कोणाच्याही शिफारशी शिवाय संबधित व्यक्तीची निवड करते. योग्य व्यक्ती असेल तरच त्यावर्षीचा हा पुरस्कार दिला जातो अन्यथा नाही हेच ह्या पुरस्काराचे वैशिष्ठ आहे. वर्ष २००५-२००६ पासुन हा पुरस्कार देणे चालू झाले. आजपर्यंत केवळ चार अधिकार्यांनाच ह्या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.अशाप्रकारे शासकीय अधिकार्यांना त्यांच्या योग्य कामाबद्दल सन्मानाने गौरव करणारी ही एकमेव बिगर शासकीय संस्था असल्याने सर्वच शैक्षणिक घटकातुन त्याचे स्वागत करण्यात येते.
माननीय श्री.जी.टी.देशमुख, माननीय श्री.मधुकर देसले, माननीय श्री.प्रकाश परब ,माननीय श्री. अनिल गुंजाळ व श्री. गंगाधर म्हमाणे (शिक्षण संचालक(माध्य) महाराष्ट्र राज्य.पुणे ) अशा दिग्गज व्यक्तींना आजपर्यंत पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.
शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार. २०१९-२०
• श्री.भास्कर बोदवडे ( सहाय्यक लेखा अधिकारी.)
इतर कार्यक्रम
- दरवर्षी रथसप्तमीला वर्धापन दिन साजरा केला जातो. त्या वेळी सभासद कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी होऊन आनंद घेतात.कुटुंबियांना देखील पतपेढी आपले घर वाटते आणि परिचय आपुलकी वाढते.
- पतपेढीचा कोणीही सभासद निवृत्त झाला की पतपेढीतर्फे मान्यवरांच्या हस्ते निवृत्तांचा गौरव केला जातो आणि भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या जातात.
- सभासदांच्या गुणी पाल्यांचे कौतुक त्याचा सत्कार करून पतपेढी करते.
- पतपेढीच्या सभासदांच्या घरी त्याचे अथवा कुटुंबियांपैकी कोणाचा विवाह झाला की पतपेढी त्यांना घरचा आहेर करायला विसरत नाही.
- पतपेढीने आपल्या सभासदांसाठी कल्याणनिधी जमवला आहे. आपतकालात सभासदाला विनापर्तीची आर्थिक मदत केली जाते.
- बचतीची सवय वाढावी म्हणून पतपेढी आकर्षक व्याजावर ठेवी स्वीकारते.
- आवर्त ठेवीचीही सोय करते एकूण विविध आर्थिक सांस्कृतिक योजना राबवते.